Birthday Special : प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 11:18 AM2020-01-31T11:18:00+5:302020-01-31T11:19:18+5:30

प्रिती झिंटा सध्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहे. आज तिचा 45 वा वाढदिवस.

birthday special know unknown facts about preity zinta | Birthday Special : प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती?

Birthday Special : प्रिती झिंटाने का नाकारली 600 कोटींची संपत्ती?

googlenewsNext
ठळक मुद्देमणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला  ब्रेक मिळाला.

गालावर सुंदरशी खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज (31 जानेवारी) प्रितीचा वाढदिवस. आज प्रिती बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तिचे चाहते कमी नाहीत. लहानपणीच प्रितीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर प्रितीला अनेक संघषार्चा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही.

३१ जानेवारी १९७५ ला हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये प्रितीचा जन्म झाला. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, प्रिती एक बास्केटबॉल खेळाडू होती. पण वयाच्या तेराव्या वर्षी प्रितीवर अचानक घराची सगळी जबाबदारी आली. ती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातात तिची आईदेखील जखमी झाली होती. दोन वर्षे तिची आई बिछाण्यावर होती. या दोन वर्षांत अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या घटनेने प्रितीचे अख्खे आयुष्य बदलले. पण प्रितीने हार मानली नाही.

मानसशास्त्रात एम ए केल्यानंतर प्रितीने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अनेक जाहिरातींसाठी तिने मॉडल म्हणून काम केले. लिरिल साबण आणि पर्क चॉकलेटच्या जाहिरातीने प्रिती सगळ्यांच्या डोळ्यात भरली. याचकाळात तिची निर्माते शेखर कपूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी तिला चित्रपटात येण्याचा सल्ला दिला. सोबतच आपल्या अ‍ॅड एजन्सीची एक जाहिरातही आॅफर केली.

शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू ठरला. पण  पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला  ब्रेक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. चित्रपटात ती केवळ २० मिनिटे दिसली. पण या २० मिनिटांत प्रितीने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली. यातील भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, अ‍ॅक्टिंग व बिझनेस याशिवाय प्रिती बीबीसीसाठी लिखाणही करायची. एकदा 600 कोटी रूपयांची संपत्ती मिळवण्याची संधी प्रितीपुढे चालून आली होती. पण प्रितीने ही संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला. होय, प्रिती ही शानदार अमरोहींची दत्तक मुलगी असल्याचे म्हटले जाते. शानदार अमरोही यांच्या निधनानंतर त्यांची 600 कोटींची संपत्ती प्रितीच्या नावावर होणार होती. कमाल अमरोही यांच्या अमरोही स्टुडिओच्या वादात प्रितीने शानदार अमरोहींची बाजू घेतली होती. त्यामुळेच 600 कोटींची संपत्ती प्रितीच्या नावावर करण्याचा निर्णय शानदार अमरोहींनी घेतला होता. मात्र, प्रितीने ही संपत्ती स्वीकारली नाही.

Web Title: birthday special know unknown facts about preity zinta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.