Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळीने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, फोटो शेअर करत म्हणते- "फायनली..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:15 IST

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नुकतंच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. लालबागचा राजानंतर अभिनेत्रीने मुंबईचा राजा गणेशगल्ली बाप्पाचंही दर्शन घेतलं. 

संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणरायाचं आगमन झालं. आता १० दिवसांनी सर्वांचे लाडके बाप्पा निरोप घेण्याच्या तयारीत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला. मुंबईतील भाविकांची श्रद्धा असणाऱ्या लालबागचा राजाच्या चरणी दरवर्षी लाखो भाविक नतमस्तक होतात. लाडक्या राजाची एक झलक पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी लालबागचा राजाचं दर्शन घेतात. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नुकतंच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. 

लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ता लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक झाली. हे फोटो शेअर करत तिने "फायनली...लालबागचा राजा" असं कॅप्शन दिलं आहे. लालबागचा राजानंतर अभिनेत्रीने मुंबईचा राजा गणेशगल्ली बाप्पाचंही दर्शन घेतलं. 

प्राजक्ता ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या प्राजक्ताला 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.  या मालिकेतील मेघना या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. प्राजक्ताने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'चंद्रमुखी', 'पावनखिंड', 'तीन अडकून सिताराम', 'व्हाय', 'खो खो', 'डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमांमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. प्राजक्ताने रानबाजार या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :गणेशोत्सव 2024प्राजक्ता माळीसेलिब्रिटी गणेशलालबागचा राजा