Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळीच्या मुंबईतील घराला १० वर्ष पूर्ण, शेअर केली पोस्ट; म्हणाली, " आयुष्यातले चढ उतार.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:41 IST

प्राजक्ता आणि तिचं मुंबईतलं घर, १० वर्षांचा सहवास

प्राजक्ता माळी (Prajakta Mali)  गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. मालिका, चित्रपटांमध्ये ती दिसते. मूळची पुण्याची असलेली प्राजक्ता अनेक वर्षांपासून शूटिंगमुळे मुंबईत राहते. तिच्या मुंबईतील घराला १० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त तिने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच हे १० वर्ष साजरे करण्यासाठी तिचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा मित्रपरिवारही तिच्या घरी आला होता. घरात त्यांनी पूजाही केली. याचे फोटोही तिने शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीच्या मुंबईतील घराला १० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने तिने फोटो शेअर केले आहेत. यासोबत ती लिहिते, "मी आणि माझं घर...१० वर्ष झाली. विश्वासच बसत नाही. वेळ किती पटकन जातो. या घराने मला कंफर्ट, शांतता आणि मुंबईत राहण्याचं एक ठोस कारण दिलं. या घराने माझ्या आयुष्यातील आणि करिअरमधील सर्व चढ उतार पाहिले माझा संघर्ष पाहिला. इथेच मी नाचले, रडले आणि काय काय नाही केलं. हे माझं पहिलं घर आहे आणि कायम माझ्यासाठी खास राहील."

"आर्ट ऑफ लिव्हिंगचं माझं कुटुंब आज घरी आलं होतं. गुरु पूजा, रुद्रपूजा आणि भजनाने घरात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आमचा छान वेळ गेला. इतकं छान घर आणि कुटुंब मला लाभलं आहे याबद्दल आभार मानावे तेवढे कमीच आहेत."

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सूत्रसंचालन करत आहे. नुकतीच ती 'चिकी चिकी बुबूम बूम' सिनेमात दिसली. प्राजक्ता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यातही व्यग्र असते. 

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतासुंदर गृहनियोजनमुंबई