Join us

प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- "मुलगी होऊनही संसार सांभाळत..."

By कोमल खांबे | Updated: February 21, 2025 12:17 IST

प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलिया भटचं कौतुक केलं.

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. तिने अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. पण,प्राजक्ताला मात्र बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचे कपडे आवडतात. 

प्राजक्ताने नुकतीच जयंती वाघधरेच्या 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये प्राजक्ताने अनेक गोष्टी सांगितल्या. यामध्ये तिला "कोणत्या अभिनेत्रीची स्टाइल तुला आवडते?", असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत प्राजक्ताने आलिया भटच नाव घेतलं. प्राजक्ता म्हणाली, "आलिया भट वेगवेगळे आऊटफिट्स ट्राय करते ते मला आवडतं. तिने अजून कशालाच हद्दपार केलेलं नाही. मला तिचं फार कौतुक आहे. मुलगी होऊनही नवरा संसार सांभाळत ती करिअर करत आहे. हे जमलं पाहिजे. हे किती छान आहे. मी प्रेरित झाले". 

दरम्यान, प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'नकटीच्या लग्नाला सावधान', 'सुवासिनी' या मालिकांमध्ये ती दिसली होती. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताने 'तांदळा', 'पांडू', 'पावनखिंड', 'खो खो' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'फुलवंती'मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली. या सिनेमाची निर्मितीही तिनेच केली होती. 

टॅग्स :प्राजक्ता माळीआलिया भटटिव्ही कलाकार