Join us
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या कुशीत प्राजक्ताने घेतलंय टुमदार घर, नाव आहे खूपच खास; म्हणाली, 'खानदानातल्या...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 16:25 IST

शहरातील गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत आपलं एक घर असावं अशी प्राजक्ताची इच्छा होती. घराचं नाव काय माहितीए का?

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) एक मोठं स्वप्नं पूर्ण झालं आहे. स्वत:चं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. शहरातील गोंगाटापासून दूर  निसर्गाच्या कुशीत आपलं एक घर असावं अशी प्राजक्ताची इच्छा होती. तिचं हेच स्वप्न पूर्ण झालंय. प्राजक्ताने कर्जतला निसर्गाच्या सान्निध्यात घर घेतल्याची पोस्ट शेअर केली आहे. घराचे आणि आजूबाजूच्या परिसराचे फोटोही तिने शेअर केले आहेत.

'वाह दादा वाह' असं म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी सर्वांची लाडकी प्राजू चर्चेत आहे. प्राजक्ताने पुणे मुंबई नाही तर थेट कर्जतला निसर्गाच्या सान्निध्यात घर खरेदी केलं आहे. हिरवागार परिसर, छोटे छोटे धबधबे आणि सुंदर निसर्ग अशा नयनरम्य ठिकाणी प्राजक्ताचं टुमदार घर आहे. प्राजक्ताने घरासमोरील फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कर्जतला निसर्गाच्या कुशीत घर घ्यायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मात्र स्वप्न साकार करण्याशिवाय दुसरा कोणता आनंद नाही.

प्राजक्ता लिहिते, 'स्वप्न साकार…Happy owner of my dream “Farm House”. (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. कर्जत.  नाव असणार आहे - “प्राजक्तकुंज”.  (१- प्राजक्तप्रभा २- प्राजक्तराज ३- प्राजक्तकुंज, प्राजक्तत्रयी पुर्ण.)  खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी...फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.'

प्राजक्ताचं कर्जतचं फार्म हाऊस नक्कीच खास असणार. पण तिने फार्म हाऊसला दिलेलं नाव त्याहीपेक्षा जास्त विशेष आहे. 'प्राजक्तकुंज' या नावाने नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताच्या आनंदात तिचे चाहतेही सहभागी झालेत. सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट केली आहे.'वाह वाह झालं का अभिनंदन' अशा शब्दात तिने कौतुक केलं आहे.

प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच घर घेतल्याची हिंट चाहत्यांना दिली होती. तिने घराबाहेर लावण्यात येणाऱ्या सुंदर नेमप्लेटचाही फोटो शेअर केला होता. तेव्हापासून चाहत्यांना तिचं नवीन घर बघण्याची इच्छा होती. अखेर आज प्राजक्ताने सर्वांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीसुंदर गृहनियोजनकर्जतमराठी अभिनेता