Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी किंचाळणार होते तेवढ्यात त्यानं...", वर्षा उसगांवकर यांनी सांगितले चाहत्यांकडून आलेले विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:39 IST

सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर वर्षा यांची चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

मराठी चित्रपटसृष्टीत सोज्वळ अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत जम बसवला. वर्षा यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर वर्षा यांची चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. केवळ एक झलक पाहण्यासाठी चाहतावर्ग शुटिंगच्या ठिकाणी गर्दी करत असे. त्यांना भेटण्यासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार असायचे. अलिकडेच त्यांनी चाहत्यांकडून आलेल्या विचित्र अनुभवाविषयी भाष्य केलं. 

वर्षा उसगांवकर यांनी नुकतेच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील खास किस्से सांगितले. या मुलाखतीमध्ये त्यांना कोणता विचित्र चाहता भेटला का किंवा असा काही अनुभव आला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी चाहत्यांकडून आलेले धक्कादायक अनुभव शेअ केले. त्या म्हणाल्या, 'काही काळापुर्वी माझा एक प्रयोग एका गावात होता. तेव्हा एका शाळेत मी मेकअप करत होते. हॉरर फिल्ममध्ये असतं तसं मला खिडकीजवळ अशी चार बोट दिसली आणि एक मुलगा अचानक वरती आला. मी किंचाळणार होते तेवढ्यात तो म्हणाला मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी पाईपवर चढून वरती आलो. मला फक्त अ‍ॅटोग्राफ द्या'.

पुढे त्या म्हणााल्या, 'एकदा मी रेल्वेने पुण्याला जात होते आणि गाढ झोप लागली होती. तेव्हा अचानक मला कोणीतरी मला गदागदा हलवलं. ती एक मुलगी होती.  यावर अशी काय पद्धत आहे का उठवण्याची म्हणत मी तिच्यावर खूप ओरडले. पण, ती म्हणते आता उठला आहात ना, 'माझं स्टेशन येत आहे. मला तुमचा अटोग्राफ हवा आहे'.  तसेच मला अनेकदा रक्ताने लिहलेली पत्रे आली आहेत.  दुसरा एक अनुभव असा होता की, 'मी एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी साडेसहा वाजता माझ्या रूमची बेल वाजली. मी दार उघडलं आणि समोर पाहते तर माझा चाहता होता.'' तो मला म्हणाला की, ''मॅडम मला तुमची सही हवी आहे. त्यातून इतक्या सकाळी सकाळी त्यानं माझी सही मागितली होती'.

टॅग्स :वर्षा उसगांवकरसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडसोशल मीडिया