Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:20 IST

poojappura ravi: गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. वार्धक्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत होता.

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता पूजापुरा रवि (poojappura ravi) यांचं निधन झालं आहे. ते 86 वर्षांचे होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. इडुक्की जिल्ह्यातील मरुर येथे राहत्या घरी त्यांचं निधन झालं. पूजापुरा यांच्या निधनामुळे मल्याळम सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून अनेक जणांनी शोक व्यक्त केला आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये पुजापूरा हे तिरुअनंतपुरम येथून इडुक्की येथे त्यांच्या निवासस्थानी राहायला गेले होते. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. वार्धक्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, पूजापुरा रवि हे मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता होते. त्यांनी ८०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं होतं. गप्पी हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीनाटक