Join us

मुंबईत Sea Facing आलिशान बंगला, पूजा हेगडेची सर्वत्र चर्चा; किंमत ऐकून व्हाल शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 18:50 IST

अनेक बॉलिवूड कलाकारांचे वास्तव्य असलेल्या बांद्रा या उच्चभ्रू परिसरातच तिनेही बंगला खरेदी केला.

मुंबईत जन्माला आलेली मात्र साऊथ सिनेमांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सध्या चर्चेत आहे. साऊथमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेणारी आणि नाव कमावणाऱ्या पूजाने आता मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे. हे घर साधंसुधं नसून Sea Facing view असलेला बंगला तिने खरेदी केला आहे. बंगल्याची किंमत तर भल्याभल्यांची झोप उडवणारी आहे.

पूजा हेगडेने 2016 साली 'मोहेंजोदरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती काही हिंदी सिनेमांमध्ये झळकली. आता पूजाने वयाच्या ३३ व्या वर्षी मुंबईत आलिशान बंगला खरेदी केला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांचे वास्तव्य असलेल्या बांद्रा या उच्चभ्रू परिसरातच तिनेही बंगला खरेदी केला. बांद्रा पश्चिमेला समुद्रकिनारी असलेल्या एका जुन्या बंगल्याची खरेदी तिने केली असून तिच्या आवडीनुसार बंगल्याचा कायापालटही केला आहे. विशेष म्हणजे चार हजार चौरस फूटांचा हा बंगला तिने तब्बल 45 कोटी रुपये किंमतीला खरेदी केला. त्यामुळे पूजाही आता बांद्रात राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच जॉन अब्राहमनेही बांद्रा येथेच एक जुना बंगला खरेदी केला होता. त्याची किंमत तब्बल 70 कोटी इतकी होती. मुंबईत घरांचे वाढते भाव पाहता बॉलिवूड मंडळी कोट्यवधी रुपयांना बंगल्यांची खरेदी करत आहेत. काही जण भाड्याने राहण्यास पसंती देत आहेत तर काही जण मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करत आहेत.

टॅग्स :पूजा हेगडेबॉलिवूडमुंबईसुंदर गृहनियोजनसेलिब्रिटी