Join us
Daily Top 2Weekly Top 5

 42 वर्षांच्या या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 12:51 IST

कधी काळी अक्षय कुमारसोबत या अभिनेत्रीचे अफेअर होते. आता तिने दुसरे लग्न केले आहे.

ठळक मुद्देनवाब अभिनेता आहे. सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्रा ती बॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांत तिले काम केले होते. पण ‘विरासत’ या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. याच पूजाने गुपचूप लग्न केल्याची बातमी आहे. होय, पूजा बत्रा दीर्घकाळापासून अभिनेता नवाब शाहला डेट करत होती. आता हे जोडपे लग्नबंधनात अडकले आहे. दोघांनीही अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही. पण दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचा खुलासा झाला आहे. पूजाने नुकताच एक फोटो शेअर केला. यात तिच्या हातात लाल चुडा आहे. यावरून पूजाने लग्न केले हे स्पष्ट आहे.

सध्या पूजा व नवाब दोघेही गोव्यात निवांत वेळ घालवताहेत. अलीकडे पूजाने आपल्या इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. यात ती रेट्रो वॉक करताना दिसली होती. पाठोपाठ नवाबनेही हाच फोटो शेअर केला होता. नवाबने याआधीही पूजाचे अनेक फोटो शेअर केले होते. पण यातल्या एकाही फोटोत पूजाचा चेहरा दिसला नव्हता. सात दिवसांपूर्वी नवाबने एक  व्हिडीओ शेअर केला होता. यात पूजा व त्याचे केवळ हात दिसत होते. या फोटोतही पूजाच्या हातात लाल चुडा होता.

पूजाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात कमबॅक केला होता. पण तिला  यश मिळाले नाही.

पूजाचे अभिनेता अक्षय कुमारसोबतचे अफेअर देखील चांगलेच गाजले होते. पूजाच्या मॉडलिंगच्या दिवसांपासून ती अक्षयला ओळखत होती. आजही पूजा आणि अक्षय यांच्यातील मैत्री कायम आहे. पूजाच्या २०१७ ला प्रदर्शित झालेल्या ‘मिरर गेम’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अक्षयने आवर्जून उपस्थिती लावली होती.  नवाबबद्दल सांगायचे झाल्यास, तो अभिनेता आहे. सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

टॅग्स :पूजा बत्रासलमान खानअक्षय कुमार