Join us

PS-I Ponniyan Selvan Trailer: जबरदस्त! ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियन सेल्वन’चा ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ला विसराल...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 15:33 IST

PS-I Ponniyan Selvan Trailer: ट्रेलरमधील प्रत्येक सीन तुम्हाला खिळवून ठेवतो. युद्धाचे प्रसंग पाहताना तर अंगावर शहारा येतो. शिवाय हमखास ‘बाहुबली’ची आठवण येते...

PS-I Ponniyan Selvan Trailer: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) चार वर्षानंतर कमबॅक करतेय. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ (PS-I Ponniyan Selvan ) या चित्रपटात ती नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याचे चाहते दीर्घकाळापासून या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 3 मिनिट 23 सेकंदाचा हा भव्य दिव्य ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ची आठवत येते.  सोशल मीडियावर या ट्रेलरची जबरदस्त चर्चा आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा विविध भाषेत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.   ट्रेलरमधील प्रत्येक सीन तुम्हाला खिळवून ठेवतो. युद्धाचे प्रसंग पाहताना तर अंगावर शहारा येतो. शिवाय हमखास ‘बाहुबली’ची आठवण येते.

‘पोन्नियन सेल्वन’ हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे.  10व्या शतकातील चोलांचा गौरवशाली इतिहास दर्शवणाºया या भव्यदिव्य चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरच्या शेवटी ऐश्वर्या समोर येते आणि सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिची व्यक्तिरेखा आणि सौंदर्य पाहून तुम्हाला ‘देवदास’मधली पारो किंवा ‘जोधा अकबर’मधील जोधाची आठवल्याशिवाय राहणार नाही.  500 कोटी बजेटच्या या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ती राजकुमारी नंदिनी आणि मंदाकिनी देवीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय शोभिता धुलिपाला देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यामध्ये ती राणी वनथीची भूमिका साकारणार आहे. सोबतच साऊथचा सुपरस्टार अभिनेता विक्रम यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, लाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  हा सिनेमा दोन भागात रिलीज होणार आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनमणी रत्नमTollywoodबॉलिवूड