1 / 9Nikhat Zareen World Champion Indian Boxer : भारताची महिला बॉक्सर निखत झरिन हिने गुरूवारी इतिहास रचला. तिने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ५२ किलो वजनी गटात तिने थायलंडच्या खेळाडूचा पराभव केला.2 / 93 / 9२५ वर्षीय निखत वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारी पाचवी भारतीय महिला बॉक्सर ठरली. निखत बॉक्सिंग रिंगमध्ये जरी प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ असली तरीही खऱ्या आयुष्यात मात्र ती खूपच ग्लॅमरस आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो चांगलेच चर्चेत असतात.4 / 95 / 9निखतचा जन्म १४ जून १९९६ ला तेलंगणा मधील निजामाबाद मध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव मुहम्मद जमील अहमद आणि आईचे नाव परवीन सुल्ताना आहे.6 / 9१३ वर्षांच्या वयातच निखतने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. निखतने दिग्गज बॉक्सर मेरी कोन हिच्याशीही अनेक वेळा बॉक्सिंग रिंगमध्ये दोन हात केले आहेत.7 / 9निखत झरिनने कारकिर्दीतील पहिलं पदक २०१० साली नॅशनल सब ज्युनियर मीट मध्ये मिळवलं होतं. त्यानंतर वयाच्या १५व्या वर्षी निखतने देशासाठी गोल्ड मेडल मिळवलं.8 / 99 / 9तुर्कस्तानमध्ये २०११ साली महिला ज्युनियर आणि युथ बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने गोल्ड मेडल मिळवलं. (सर्व फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)