Join us

Malaika Arora : मलायका चित्रपटांत काम का करत नाही? इतक्या वर्षांनंतर समोर आलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 15:14 IST

1 / 9
मलायका अरोरा सध्या तिच्या नव्या शोमुळे चर्चेत आहे. होय. ‘मुव्हिंग इन विद मलायका’ या तिच्या शोचा पहिला एपिसोड नुकताच टेलिकास्ट झाला. पहिल्याच एपिसोडमध्ये मलायकाने अनेक खुलासे केलेत.
2 / 9
होय, स्वत:चं पर्सनल लाईफ, लव्ह लाईफ, करिअर अशा वेगवेगळ्या विषयांवर ती बिनधास्त बोलली. अगदी मनातील एक भीतीही तिने बोलून दाखवली.
3 / 9
मलायका बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत आयटम सॉन्ग करताना दिसली. पण चित्रपटात अ‍ॅक्टिंग करण्यास तिने नेहमीच नकार दिला. असं का? याचं उत्तर मलायकाने दिलं.
4 / 9
तुला अ‍ॅक्टिंगची भीती वाटते का? म्हणून तू अनेक सिनेमाच्या स्क्रिप्ट धुडकावल्या का? या प्रश्नावर मलायका बोलली.
5 / 9
मी अ‍ॅक्टिंगला घाबरत नाही. त्याची भीती नाही. पण इतक्या लोकांसमोर डायलॉग्स पाठ करून ते बोलणं हे मला जमत नाही. त्यात मी कम्फर्टेबल नाही. कॅमेºयासमोर चेहºयावरच्या भाव भावनांसह संवाद म्हणणं मला जमत नाही आणि त्याचीच मला भीती वाटते, असं मलायका म्हणाली.
6 / 9
कॅमेऱ्यासमोर डायलॉग्स म्हणताना मी घाबरते, नर्व्हस होते आणि कदाचित म्हणून मी आत्तापर्यंत यापासून दूर पळत आली आहे. मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. पण मी त्या नाकारल्या. हीच मोठी समस्या आहे, असंही तिने सांगितलं.
7 / 9
शाळेतही पाठ करून ते लोकांसमोर बोलायचं म्हटलं की मी घाबरायचे. हे माझ्यासाठी जगातलं सर्वात कठीण काम आहे. आजपर्यंत ही भीती मी घालवू शकली नाही, अशी कबुलीही तिने दिली.
8 / 9
मलायका अ‍ॅक्टिंगला घाबरते, हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे मलायका कधीच अ‍ॅक्टिंग करण्याच्या भानगडीत पडली नाही. त्याऐवजी डान्सच्या भरवशावर तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
9 / 9
आज मलायका अनेक डान्स शो जज करताना दिसते. अनेक फॅशन शो गाजवते. आता तर ती स्वत:चा शो घेऊन आली आहे. एकंदर काय तर अ‍ॅक्टिंग न करता तिने खूप काही मिळवलं आहे.
टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूड