रेखाच्या भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र बघून हैराण झाली होती जया, अमिताभही होते समोर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:03 IST
1 / 7रेखा नेहमीच भांगेत कुंकू भरत आली आहे. ज्यावरून अनेकदा प्रश्न विचारले जातात. रेखाच्या भांगेतील कुंकू पाहून लोकांना नेहमीच आश्चर्य वाटतं. 2 / 7आपल्या अभिनयासोबतच रेखा नेहमीच तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. अमिताभ बच्चन आणि तिच्या अफेअरची चर्चा आजही होते. अनेक किस्से तर असे आहेत जे लोकांना हैराण करतात. 3 / 7रेखाने ऋषि कपूर आणि नीतू सिंह च्या लग्नातही सगळ्यांना असाच धक्का दिला होता. रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांना वाटलं होतं की, अमिताभ आणि रेखाने लग्न तर केलं नाही ना...4 / 71979 मध्ये ऋषि कपूर आणि नीतू सिंहच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार आले होते. या लग्नात जया बच्चन आणि अमिताभ बच्चनही आले होते. पण रेखा लग्नात येताच सगळेच हैराण झाले होते. 5 / 7रेखा लाल टिकली, भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून लग्नात पोहोचली होती. रेखाला असं नवरीसारखं सजलेलं पाहून तिथे उपस्थित सगळ्यांनाच धक्का बसला होता. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की, रेखा ने लग्न केलं की काय?6 / 7मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा जेव्हा ऋषि कपूर आणि नीतू सिंहला भेटल्यानंतर अमिताभ बच्चनसोबत बोलण्यासाठी गेली तेव्हा रेखाला या गेटअपमध्ये बघून जया बच्चन घाबरल्या होत्या. कारण त्यावेळी रेखा आणि अमिताभ यांची प्रेम कहाणी चर्चेत होती. अशात रेखाला या गेटअपमध्ये बघून जया बच्चन यांना धक्का बसणं सहाजिक होतं.7 / 7नंतर या घटनेनंतर रेखाने स्वत: हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगतिलं होतं की, ती त्या लग्नात नवरीसारखी सजून-धजून का पोहचली होती. रेखा म्हणाली होती की, त्यावेळी ती थेट शूटिंगवरून आली होती. त्यामुळे भांगेतील कुंकू काढणं विसरली होती. ती म्हणाली होती की, भांगेतील कुंकू तिच्यावर फार चांगलं दिसतं.