पत्नी ऐश्वर्याची मैत्रीण श्रुति हसनसोबत धनुषच्या अफेअरची होती चर्चा, आधीच तुटणार होतं नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 11:49 IST
1 / 9साऊथचा सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतने आपले मार्ग वेगळे केले आहेत. दोघांनी सोमवारी रात्री उशीरा सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोट घेतल्याची माहिती दिली. या बातमीने फॅन्स नाराज झाले आहेत. १८ वर्षाचा संसार असा अचानक मोडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पण त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याची बातमी याआधीही एकदा आली होती. 2 / 9धनुष आणि ऐश्वर्याच्या नात्यात दरी निर्माण होण्यासाठी त्यावेळी दुसरी कुणी नाही तर ऐश्वर्याची बालपणीची मैत्रीण कमल हसन यांची मुलगी श्रुति हसन होती. २०११ मध्ये ऐश्वर्याने '३' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमावेळी धनुष आणि श्रुति हसन यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. असं बोललं जात होतं की, त्यांची जवळीक वाढत आहे.3 / 9चर्चा तर अशीही होती की, धनुष आणि ऐश्वर्याचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. या गोष्टींची इतकी चर्चा होऊ लागली होती की, श्रुति हसनला हस्तक्षेप करावा लागला होता. तिने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अफेअरची चर्चा खोटी असल्याचं सांगितलं होतं. श्रुतिने नाराजी व्यक्त करत सांगितलं होतं की, ती सगळ्यांना स्पष्टीकरण देत फिरणार नाही.4 / 9श्रुतिने धनुषसोबतच्या तिच्या बॉन्डींगबाबत सांगितलं होतं की, 'धनुष इंडस्ट्रीत माझा बेस्ट फ्रेन्ड आहे. त्याने कामात नेहमीच मला मदत केली आहे. लोक आमच्याबाबत काहीही बोलत असले तर, त्याकारणाने मी आमची मैत्री कमी होऊ देणार नाही. लोक काय म्हणतात याचा मी कधीच विचार केला नाही'.5 / 9श्रुतिने हेही सांगितलं होतं की, '३' सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी धनुषने तिला प्रोत्साहित केलं होतं. ती म्हणाली की, 'मला माहीत आहे की, हजार अफवा आहेत. माझ्या हे एका व्यक्तीसोबत खास नातं आहे. धनुष माझा खास मित्र आहे. कारण कुणालाच वाटत नव्हतं की, '३'मध्ये मी भूमिका करू शकेन. तो माझ्यासोबत उभा राहिला, त्याने मला मदत केली. मी त्याची ऋणी आहे. आमचं चांगलं नातं आहे'.6 / 9नंतर स्वत: ऐश्वर्या रजनीकांतने या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, या बातम्यांना काहीच आधार नाही. खोट्या आहेत. ३ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तीन फिल्मफेअर अवॉर्डही जिंकले. 7 / 9धनुष आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणीची सुरूवात एका सिनेमागृहात झाली होती. धनुषने सांगितलं की, ते Kandhal Kondaen सिनेमाचा फर्स्ट शो बघण्यासाठी परिवारासोबत गेले होते. सिनेमा संपल्यावर सिनेमा थिएटरच्या ओनरने धनुषला रजनीकांतच्या मुलींची भेट करून दिली.8 / 9दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने फुलं पाठवून लिहिलं होतं की, 'Good work keep in touch'. धनुषनुसार, त्याने ऐश्वर्याचं हे बोलणं फारच सीरीअसली घेतलं.9 / 9काही वर्ष डेट केल्यानंतर २००४ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यानंतर २०१० मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. १८ वर्ष त्यांनी संसार केला. धनुषने त्याच्या सेपरेशन पोस्टमध्ये याचा उल्लेख केला आहे.