'बालिका वधू'मधील छोट्या आनंदीचा होणारा नवरा आहे तरी कोण? दोघांच्या वयात आहे इतकं अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:06 IST
1 / 8२००६ साली आलेली 'बालिका वधू' मालिका खूप गाजली. यातील छोट्या आनंदीची भूमिका साकारलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor)लोकप्रिय झाली. तेव्हा ती फक्त १० वर्षांची होती.2 / 8आता हीच छोटी आनंदी म्हणजेच अविका मोठी झाली आहे. तिने नुकतीच साखरपुडा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.3 / 8अविका गेल्या ५ वर्षांपासून बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा तिने त्याच्याबरोबरचे फोटो शेअर केले होते. दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही चर्चेत होते. अखेर त्यांनी नात्याला पुढे घेऊन जायचं ठरवलं आहे.4 / 8अविकाचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी (Milind Chandwani) नक्की काय करतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. दोघांच्या वयात नक्की किती अंतर आहे हेही जाणून घेऊया5 / 8मिलिंद चंदवानीने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नंतर त्याने इन्फोसिसमधून करिअरला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने कॅम्पस डायरीज या एनजीओची स्थापना केली. 6 / 8मिलिंदने एमटीव्ही रोडीज शोमध्येही सहभाग घेतला होता. त्याचा सोशल सर्विसकडे जास्त कल आहे. तसंच तो 'कुकू एफएम'मध्ये प्रोजेक्ट मॅनेजरही होता.7 / 8मिलिंद आणि अविकाची भेट त्याच्या एनजीओच्या एका इव्हेंटमध्ये झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. 8 / 8अविका गौरचा जन्म ३० जून १९९७ सालचा आहे. काहीच दिवसात ती २८ वर्षांची होणार आहे. तर मिलिंद चंदवानी ३४ वर्षांचा आहे. दोघांमध्ये सहा वर्षांचं अंतर आहे.