Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालनची चुलत बहीण आहे 'ही' प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री, आतापर्यंत दोन वेळाच झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:21 IST

1 / 7
विद्या बालन (Vidya Balan) सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री. 'कहानी', 'द डर्टी पिक्चर','भुल भूलैय्या' सह अनेक हिट सिनेमे तिने दिले आहेत.
2 / 7
दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठीअभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे. असं असूनही दोघी आतापर्यंत दोन वेळाच भेटल्या आहेत.
3 / 7
विद्याने करिअरच्या सुरुवातीला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतही काम केले होते. मात्र तिथे तिला वाईट अनुभवही आला. तिला 'अशुभ' असा टॅग मिळाला होता.
4 / 7
विद्याची ही बहीण आहे अभिनेत्री प्रियमणि. प्रियमणिने शाहरुख खानसोबत 'जवान' सिनेमात काम केलं होतं. तसंच चेन्नई एक्सप्रेस मध्ये तिचं आयटम साँग गाजलं होतं. प्रियमणि सध्या हिंदी सिनेसृष्टीही गाजवत आहे.
5 / 7
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत प्रियमणिने ती विद्याची बहीण असल्याचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, 'तिचे आजोबा हे माझ्या आजोबांचे मोठे भाऊ आहेत. आजपर्यंत मी विद्याला दोन वेळाच भेटले आहे.'
6 / 7
ती पुढे म्हणाली, 'एकदा अवॉर्ड सेरेमनीत आमची भेट झाली. विजागमध्ये तो सोहळा होता. विद्याने एनटीआर सरांच्या आयुष्यावरील सिनेमात काम केलं होतं म्हणून ती त्या सोहळ्याला आली होती. मी पहिल्यांदा तिला पाहिलं होतं. ती खूप सुंदर आहे. आम्ही एकमेकींची गळाभेट घेतली.'
7 / 7
यानंतर शाहरुख खानच्या पार्टीत त्यांची दुसऱ्यांदा भेट झाली. विद्या बालन आणि प्रियमणि यांचं हे नातं फार कमी जणांना माहित आहे.
टॅग्स :विद्या बालनTollywoodसेलिब्रिटी