रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:35 IST
1 / 8आज शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात उत्सव साजरा केला जात आहे.2 / 8शिवजयंतीनिमित्त विकी कौशल आज रायगडला गेला होता. यानिमित्त विकीने सर्वांना दिलेला शब्द पाळला. विकी 'छावा' रिलीज झाल्यावर पहिल्यांदाच रायगडला आला.3 / 8सध्या विकी कौशलचा 'छावा' सिनेमा चांगलाच गाजतोय. त्यावेळी शिवजयंतीचं सेलिब्रेशन करण्यासाठी विकी रायगडने सर्वांसोबत रायगडला भेट दिली.4 / 8विकी यावेळेस शिवरायांचरणी नतमस्तक झालेला दिसला. पांढरा कुर्ता आणि फेटा बांधून विकी रायगडला गेला होता.5 / 8रायगडावर सिंहासनारुढ छत्रपतींच्या प्रतिमेसमोर विकी कौशल नतमस्तक झाला. छत्रपतींच्या प्रतिमेला विकी हार घालताना दिसला6 / 8उपस्थित चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत विकी कौशलने रायगडावर हजेरी लावली. विकीला भेटण्यासाठी त्याचे असंख्य चाहते आले होते.7 / 8यावेळी विकी कौशलसोबत 'छावा'चे निर्माते आणि मॅडॉक फिल्मचे सर्वेसर्वा दिनेश विजनही उपस्थित होते.8 / 8रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी विकी कौशलला छत्रपती शिवरायांची प्रतिमा सदिच्छा भेट म्हणून दिली.