By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:03 IST
1 / 7सध्या 'छावा' सिनेमाची चांगलीच चर्चा असून सिनेमाने तीन दिवसांमध्ये १०० कोटींच्या वर व्यवसाय केलाय. 'छावा' सिनेमासाठी विकीने केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे2 / 7'छावा' सिनेमासाठी विकी कौशलने खास फोटोशूट केलं होतं. 'छावा' सिनेमासाठी रंगभूषेची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रीकांत देसाईंनी हे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते3 / 7'छावा'मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विविध आऊटफिटमध्ये विकीचं फोटोशूट करण्यात आलं.4 / 7डोक्यावर मुकुट, गळ्यात सोन्याची आभूषणं परिधान करुन विकी रुबाबदार दिसतोय. विकीचे डोळे अन् त्याची भेदक नजर सर्वांचं लक्ष वेधून घेतेय5 / 7छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं गांभीर्य विकीच्या देहबोलीत दिसतंय. विकीने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत त्याच्या व्यक्तिमत्वात दिसून येतेय.6 / 7विकी कौशलने 'छावा'मध्ये साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. याचाच परिणाम म्हणजे, 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केलीय7 / 7'छावा' सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे. याशिवाय औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळतोय.