Join us

पायलटशी लग्न, काही वर्षात घटस्फोट; इस्लाम धर्म कबूल करत अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:06 IST

1 / 7
मनोरंजन क्षेत्रात कधी कोणाचे सूर जुळतील तर कधी कोणाचं नातं संपुष्टात येईल सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट आहे एका टीव्ही अभिनेत्रीची. अभिनयात येण्याआधी ती एअरहॉस्टेस होती.
2 / 7
होय अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakkar) नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दीपिकाच्या आयुष्यात शोएब येण्याअगोदर तिचा आधी घटस्फोट झाला होता. २०११ मध्ये दीपिकाने पायलट रौनक सॅमसनसह लग्न केले होते.
3 / 7
4 / 7
यानंतर दीपिकाला 'ससुराल सिमर का' ही मालिका मिळाली. या मालिकेने तिला विशेष ओळख दिली. मात्र याच मालिकेमुळे तिच्या आयुष्यात शोएब इब्राहिमची निवड झाली.
5 / 7
तेव्हा दीपिका घटस्फोटित होती तरी शोएब तिच्या प्रेमात पडला. तिलाही तो आवडायला लागला होता. शोएब आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. २०१८ मध्ये दीपिकाने इस्लाम धर्म कबूल करत शोएबशी निकाह केला.
6 / 7
दीपिका तिच्या दुसऱ्या लग्नात खूपच सुखी आहे. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. चाहत्यांनी त्यांना बराच पाठिंबा दिला. नुकतेच दीपिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
7 / 7
दीपिकाला धर्मांतर केल्याने बऱ्याचदा ट्रोलही करण्यात आले होते. तसंच त्यांच्या व्लॉग्सवरुनही त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत त्यांचा सुखी संसार सुरु आहे.
टॅग्स :दीपिका कक्करटिव्ही कलाकारलग्नघटस्फोट