By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:38 IST
1 / 8बिग बॉस सीझन १६ सर्वात धमाकेदार सीझन मानला जातोय. काही ना काही कारणाने शो चर्चेत आहे. आणि त्यातही एक चेहरा सतत पुढे दिसतोय तो म्हणजे उतरन फेम अभिनेत्री टीना दत्ता.2 / 8टीना दत्ता बिग बॉस मधील लोकप्रिय आणि ताकदीची स्पर्धक आहे. अनेकदा ती होस्ट सलमान खानच्या निशाण्यावरही असते. तर कधी शालीन भनोतसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असते.3 / 8पण टीनाचे घरातून बाहेर आल्यानंतर नशीबच उजळणार आहे. होय टीना ला मुख्य अभिनेत्री म्हणून एक दाक्षिणात्य चित्रपट ऑफर झाला आहे. ती घरातून बाहेर आल्यानंतर तिला सिनेमा ऑफर होण्याची शक्यता आहे. 4 / 8हा सिनेमा तेलुगू भाषेतील असणार आहे. एका बड्या राजकारण्याच्या मुलीची ही भूमिका असणार आहे. सिनेमात तिचे पात्र तिच्या वडिलांसोबत काम करणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडते असे आहे. अजुन सिनेमाविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.5 / 8टीना ने हा चित्रपट स्वीकारल्यास तिचे हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण असेल. टीनाने वयाच्या ५ व्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. तिने अनेक बंगाली सिनेमांमध्ये काम केले आहे.याशिवाय टीना खतरो के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती. 6 / 8टीना चा जन्म कोलकत्याचा असून तिने पोल डान्सिंग आणि किकबॉक्सिंगमध्येही प्रशिक्षण घेतले आहे. २०१९ मध्ये टाईम्स ऑफ इंडिया मोस्ट डिझायरेबल वुमन्स लिस्ट मध्ये टीना १९ व्या क्रमांकावर होती. 7 / 8कलर्स वाहिनीवरील उतरन या हिंदी मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मालिकेतील इच्छा या भूमिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. 8 / 8आता टीना बिग बॉस मुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. टीना ला सिनेमात बघण्यासाठी तर चाहते नक्कीच उत्सुक आहेत.