Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद ओक नव्हता 'धर्मवीर'साठी पहिली पसंती; 'या' अभिनेत्याची झाली होती निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 13:21 IST

1 / 9
मराठी कलाविश्वात तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे'. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
2 / 9
या सिनेमातून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडण्यात आला.
3 / 9
लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक याने या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
4 / 9
विशेष म्हणजे प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक पहिली पसंती नव्हती. त्याच्या ऐवजी एका दिग्दर्शकाची निवड करण्यात आली होती. प्रविण तरडे यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे.
5 / 9
“ज्यावेळी माझे चीफ एडिटर विनोद वनवे यांनी प्रसाद ओकचं नाव आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी सुचवलं होतं. त्यावेळी मी जरा साशांक होतो. प्रसाद कसा दिसेल असा मला प्रश्न होता. त्यानंतर त्यांनी आनंद दिघे यांचे काही स्केचेस तया करुन मला दाखवले. त्यातून एक लूक फायनल केला आणि हा प्रसाद ओक आहे असं सांगितलं, असं प्रविण तरडे म्हणाले.
6 / 9
मात्र, आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. प्रसाद ऐवजी त्यांनी मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने याला पहिली पसंती दिली होती.
7 / 9
या भूमिकेविषयी विजू मानेला विचारण्यातही आलं होतं. मात्र, नंतर ही भूमिका प्रसादच्या पदरात पडली.
8 / 9
धर्मवीर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजल्यानंतर त्याचा पुढील भाग २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9 / 9
आनंद दिघे यांचं निधन झाल्यानंतर पुढे काय घडलं हे धर्मवीर पार्ट २ मध्ये दाखवलं जाणार आहे.
टॅग्स :सिनेमाप्रसाद ओक प्रवीण तरडेसेलिब्रिटी