By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 12:05 IST
1 / 7दक्षिणेतील अभिनेत्री ह्या वैवाहिक नातं खूप चांगल्या पद्धतीने निभावतात, असं म्हटलं जातं. मात्र यापैकी काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी आपलं वैवाहिक नातं टिकवण्यासाठी फार काही केलं नाही आणि त्या नात्यातून वेगळ्या झाल्या. यामध्ये समंथा रुथ-प्रभूपासून ते अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींचा समावेश आहे. 2 / 7नागार्जुन यांची माजी सून समंथा रुथ प्रभू हिनं नागा चैतन्य याच्याशी विवाह केला होता. दोघांचाही प्रेमविवाह होता. त्यांचं १० वर्षांपासून नातं होतं. मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत. समंथा रुथ प्रभूने विवाहाच्या तीन वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 3 / 7तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटातील प्रख्यात अभिनेत्री सारिका हिने सुपरस्टार कमल हसन याच्याशी विवाह केला होता. त्यांच्या नात्यात अनेक चढ ऊतार आले. त्यानंतर त्यांनी आपलं नातं संपवून नव्या आयुष्याला सुरुवात केली. 4 / 7तामिळ अभिनेत्री अमला पॉल हिने २०१४ मध्ये के.एल. विजय यांच्याशी विवाह केला होता. मात्र तीन वर्षांतच त्यांचं नातं संपुष्टात आलं. सध्या ती दुसऱ्या लग्नाबाबतच्या अनेक रिपोर्टमुळे मीडियामध्ये चर्चेत आहे. 5 / 7९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती हिचाही घटस्फोट झालेला आहे. तिने सुरेशचंद्र मेनन यांच्याशी १९८६ मध्ये विवाह केला होता. २०१३ मध्ये त्यांचाय घटस्फोट झाला होता.6 / 7सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. तिने धनुष याच्याशी विवाह केला होता. दोघांनी १८ वर्षे संसार केल्यानंतर २०२२ मध्ये धटस्फोट घेतला होता. 7 / 7मकडी फेम अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद हिने व्यावसायिक रोहित याच्याशी २०१९ मध्ये विवाह केला होता. तिचा विवाह एक वर्षही चालला नाही. तसेच दोघांनीही २०२० मध्ये घटस्फोट घेतला.