Abhishek Suhani Wedding : 'Yeh Hai Mohabbatein' फेम Abhishek Malikने गर्लफ्रेंड Suhani Chaudharyसोबत केलं लग्न, विवाहातील खास फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:40 IST
1 / 9टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ये है मोहब्बते फेम अभिषेक मलिक याने गर्लफ्रेंड सुहानी चौधरी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून फॅन्सना दिली आहे. 2 / 9त्यांचा विवाह सोहळा अगदी खासगीपणे पार पडला. १९ ऑक्टोबरला हा विवाह सोहळा संपन्न झाला. तत्पूर्वी त्यांचे प्री-वेडिंग सेरेमनी २ ते ३ दिवस आधी सुरू झाली होती. त्यामध्ये हळद, मेहंदी सोहळे पार पडले. 3 / 9यादरम्यानचे अनेक फोटो अभिषेक मलिक याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अभिषेक मलिकने आपले टीव्हीवरील पदार्पण छल, शह और मात या मालिकेमधून केलं होतं. 4 / 9विवाहाचे फोटो शेअर करताना अभिषेकने लिहिले की, मिस्टर आणि मिसेस मलिक, फॅन्स अभिषेकच्या या पोस्टवर सातत्याने कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. एवढेच नाही तर अनेक टीव्ही सेलेब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 5 / 9अभिषेक याने विवाहावेळी शेरवानी परिधान केली आहे. तसेच लाल रंगाचा फेटा परिधान केला होता. तर सुहानी चौधरी हिने बेज आणि पेस्टल कलरचा लेहंगा परिधान केला होता. 6 / 9तसेच लाईट ज्वेलरीसोबत न्यूड मेकअप केला होता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. दोघेही कॅमेऱ्यामध्ये पाहून पोझ देत होते. अभिषेकने हळद, संगीत मेहंदी सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये तो सुहानी चौधरीला किस करतानाही दिसत आहे. 7 / 9वर्कफ्रंटचा विचार केल्यास अभिषेक मलिक पिंजरा खुबसुरती का मालिकेत अखेरचा दिसला होता. त्याशिवाय कहां हम कहां तुम, कैसी ये यारियां आणि पुनर्विवाह एक नई उम्मीद या मालिकांमध्ये दिसला होता. 8 / 9अभिषेकने सुहानीला फिल्मी स्टाईलमध्ये अंगठीही घातली9 / 9ये हैं मोहब्बतें मालिकेमधून अभिषेक मलिकचे नाव घराघरात पोहोचले होते.