1 / 7रामायण मालिकेची चांगलीच चर्चा झाली. आजही ही मालिका युट्यूबवर आवडीने पाहिली जाते. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखेतील कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 2 / 7'रामायण' मालिकेतील अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे जांबुवंत. बुलंद आवाजात संवाद बोलणाऱ्या जांबुवंताची भूमिका कोणी साकारली हे ९९% लोकांना माहित नसेल3 / 7'रामायण' मालिकेत जांबुवंताची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे राजशेखर उपाध्याय. राजशेखर यांनी जांबुवंताची भूमिका अजरामर केली4 / 7मूळचे बनारस शहरात राहणारे असलेले अभिनेते राजशेखर यांनी शिकत असतानाच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. ते अनेकदा रामलीलामध्ये अभिनय करायचे5 / 7एकदा रामलीलामध्ये अभिनय करत असतानाच रामानंद सागर त्यांच्या अभिनयाने प्रभावित झाले. राजशेखर यांचा पहाडी आवाज ऐकून त्यांनी रामायण मालिकेत त्यांना कास्ट केलं6 / 7राजशेखर यांनी रामायण मालिकेत जांबुवंत आणि श्रीधर या दोन व्यक्तिरेखा साकारल्या. परंतु त्यांना खरी ओळख जांबुवंताच्या भूमिकेमुळेच मिळाली7 / 7रामायण मालिकेनंतर राजशेखर यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. ते सोशल मीडियावर रामायण मालिकेविषयीच्या आठवणी शेअर करताना दिसतात