By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:01 IST
1 / 8पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) दुसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे. सना जावेद (Sana Javed) सोबत त्याने निकाह केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शोएब आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत होत्या.2 / 8शोएब आणि सानिया दोघांनीही कधीच अधिकृत विधान केलं नाही. आता शोएबने थेट दुसऱ्या विवाहाचे फोटो शेअर करत सरप्राईजच दिलं आहे. कोण आहे सना जावेद?3 / 830 वर्षीय सना जावेद पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यावर जगभरातील चाहते फिदा आहेत. शोएब आणि सनाने काही अॅड शूट्ससाठी एकमेकांसोबत काम केलं होतं. तेव्हाच दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये तब्बल 11 वर्षांचं अंतर आहे.4 / 8सना जावेदने अगदी लहान वयात मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत करिअरला सुरुवात केली होती. 2012 साली तिने 'मेरा पहला प्यार' सीरिजमध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. त्याचवर्षी ती 'शहर-ए-जात' मध्ये छोट्या भूमिकेत दिसली.5 / 82017 साली सनाने कॉमेडी सिनेमा 'मेहरुन्निसा vs लब यू' सिनेमात काम केले. यानंतर तिला टीव्ही मालिका 'खानी' मधून लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने 'खानी'ही मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर सना टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री बनली.6 / 8२०२० साली आलेल्या तिच्या 'डंक' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. मालिकेचा विषय वादग्रस्त असल्याने तिची खूप चर्चा झाली होती. मात्र सनाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. 7 / 8२५ मार्च 1993 रोजी जेदाह सौदी अरेबिया येथे सना जावेदचा जन्म झाला. सनाचं हे दुसरं लग्न आहे. २०२० साली तिने पाकिस्तानी अभिनेता उमैर जैस्वालसोबत निकाह केला होता. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. पाकिस्तानातील ते मोस्ट फेवरेट कपल बनलं होतं. 8 / 8