Join us

कोण आहे रुचिता जाधव? रोहित आर्या प्रकरणामुळे आली चर्चेत; 'या' मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:57 IST

1 / 7
मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओ येथे रोहित आर्या या व्यक्तीने मुलांना ओलीस ठेवले. या घटनेने काल मुंबई हादरली होती. पोलिसांनी मुलांना सुखरुप बाहेर काढलं. यावेळी रोहित आर्यावर गोळी चालवावी लागली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
2 / 7
या घटनेनंतर रोहित आर्याचे अनेक जुने व्हिडीओही समोर आले. तर आता त्याचं मनोरंजनविश्वाशी असलेलं कनेक्शनही समोर आलं. त्याने काही मराठी अभिनेत्रींनी मेसेज करुन सिनेमाची ऑफर दिली होती.
3 / 7
त्यातच एक अभिनेत्री रुचिता जाधव. रुचिताला रोहित आर्याने मेसेज करुन फिल्म प्रोजेक्टची ऑफऱ दिली. अपहरणाचा असा असा सीन असल्याचंही त्याने तिला सांगितलं होतं. त्याने तिला पवईच्या त्याच स्टुडिओत २७ ऑक्टोबर रोजी बोलावलं होतं.
4 / 7
अभिनेत्री रुचिता जाधव मूळची पुण्याची आहे. तिने याआधी अनेक मराठी सिनेमा, टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.
5 / 7
२०११ साली तिने 'अरे बाबा पुरे'या मराठी सिनेमातून पदार्पण केलं. 'फेकम फाक', 'भूताचा हनिमून', 'वात्सल्य', 'चिंतामणी','मनातल्या उन्हात' आणि 'माणूस एक माती' या मराठी सिनेमांमध्येही ती दिसली.
6 / 7
'वीर शिवाजी' या हिंदी मालिकेत तिने सोयराबाईंची भूमिका केली होती. 'लव्ह लग्न लोचा' या झी युवावरील मराठी मालिकेमुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली.
7 / 7
चार वर्षांपूर्वी रुचिताने मुंबईतील बिझनेसमन आनंद मानसोबत लग्नगाठ बांधली. नवऱ्यासोबत ती अनेकदा फोटो पोस्ट करत असते.
टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार