पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती
By देवेंद्र जाधव | Updated: August 8, 2025 11:02 IST
1 / 7प्राजक्ता गायकवाडने काल साखरपुडा केला. प्राजक्ताच्या साखरपुड्याची खूप चर्चा झाली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही शंभूराज आहे. 2 / 7शंभूराज आणि प्राजक्ताचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.3 / 7प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभूराज खुटवड. शंभूराजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. 4 / 7मीडिया रिपोर्टनुसार शंभूराज हा पुण्याच्या फुरसंगी येथे राहणारा आहे. फुरसुंगी येथील राजकीय कुटुंबाशी शंभूराजचा संबंध आहे.5 / 7शंभूराज हा पैलवान असून तो एक उद्योजकही आहे. अशाप्रकारे प्राजक्ता ही शंभूराजशी लग्न करुन फुरसुंगीची सून होणार आहे.6 / 7प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराजच्या साखरपुड्याला सुनील तटकरे, गायिका कार्तिकी गायकवाड आणि इतर नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती7 / 7प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराजचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज याबद्दल अद्याप माहिती कळालेली नाही. पण आता दोघं लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे