1 / 7एका फॅन पेजवर तिच्या फोटोला विराट कोहलीचं लाइक दिसलं आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या. पुढे विराटला स्पष्टीकरण द्यावं लागलं. कोण आहे ती? तिचं नाव आहे अवनीत कौर2 / 7१३ ऑक्टोबर २००१ ला पंजाब येथील जालंधर येथे अवनीतजा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षापासून अवनीत मनोरंजन विश्वात सक्रीय आहे.3 / 7'बालवीर', 'सावित्री एक प्रेम कहानी' , 'झलक दिखला जा', 'एक मुठ्ठी आसमान' अशा मालिकांमघ्ये अवनीतने काम केलं. पुढे २०१४ ला राणी मुखर्जीसोबत 'मर्दानी' सिनेमात अवनीत झळकली4 / 7बोल्ड फोटो, लक्झरी लाइफस्टाइल अशा गोष्टींमुळे फार कमी वयात अवनीतला लोकप्रियता मिळाली. याशिवाय सोशल मीडियावरही अवनीतचं खूप फॅन फॉलोईंग आहे5 / 7अवनीत अनेकदा विविध देशांमध्ये असलेल्या इव्हेंटला हजेरी लावत असते. ग्लॅमरस अंदाजात प्रत्येकवेळी अवनीत सर्वांचं लक्ष वेधून घेते6 / 7अवनीतला क्रिकेटची सुद्धा प्रचंड आवड असलेलं पाहायला मिळतं. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या वेळेस अवनीत भारतीय टीमला चिअर अप करायला स्टेडियममध्ये उपस्थित असलेली दिसली.7 / 7दुबईत चॅम्पियन ट्रॉफीच्या वेळेस अवनीतचा शुबमन गिलसोबतचा फोटो व्हायरल झाला. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या. अर्थात दोघांनीही याविषयी कधीच अधिकृत खुलासा केला नाही