Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा नवरा कलाविश्वाऐवजी 'या' क्षेत्रात आहे कार्यरत, म्हणाली, 'डिमार्टमध्ये तो…'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 07:00 IST

1 / 8
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेत्री वनिता खरातला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. सध्या ती सुखी संसारामध्ये रमली आहे.
2 / 8
२ फेब्रुवारीला वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोढेंसोबत विवाह बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीत वनिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केले आहे.
3 / 8
वनिताने अभिनय क्षेत्रात स्वतःचे वेगळं स्थान निर्माण केले आहे. फक्त ती मराठी शो, चित्रपटांपुरतीच मर्यादित राहिली नाही. तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. शाहिद कपूरसह ‘कबीर सिंग’ चित्रपटामध्ये वनिताने साकारलेली भूमिका आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे.
4 / 8
वनिताने नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये सुमितबाबत सांगितले आहे. ती म्हणाली की, चाहते जेव्हा फोटो काढण्यासाठी गर्दी करतात तेव्हा सुमितला तिचा खूप अभिमान वाटतो.
5 / 8
यावेळी सुमित कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? असे वनिताला विचारण्यात आले. त्यावेळी तिने सुमित अकाउंटंट असल्याचे तिने सांगितले.
6 / 8
वनिता खरात म्हणाली की, तो एक अकाऊंटंट आहे. डिमार्टच्या हेड ऑफिसमध्ये तो अकाऊंटंट म्हणून काम पाहतो.
7 / 8
वनिता खरात आणि सुमित लोंढे हे दोघे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र तरीही दोघेही एकमेकांना अगदी उत्तम पद्धतीने समजून घेतात.
8 / 8
वनिता आणि सुमित यांचे लव्ह मॅरेज आहे. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतरचे आयुष्य अगदी छान असल्याचे वनिताने सांगितले.
टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रा