Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इंडस्ट्रीतला कोणीही नको...", ३७ व्या वर्षीही अविवाहित आहे 'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:45 IST

1 / 7
एकेकाळी 'दिल मिल गए', 'प्यार की ये एक कहानी', 'मिले जब हम तुम' या मालिका तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत्या. २००७ नंतर या मालिका आल्या होत्या.
2 / 7
यापैकी 'दिल मिल गये'मध्ये रिद्धिमाच्या भूमिकेत दिसलेली आणि नंतर 'प्यार की ये एक कहानी' मध्ये पिया या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सुकीर्ती कांडपाल (Sukirti Kandpal) आठवतेय?
3 / 7
सुकीर्ती २०२३ साली गाजलेल्या 'अनुपमा' मालिकेतही दिसली. श्रुती आहुजा ही व्यक्तिरेखा तिने साकारली. गेल्या वर्षी तिने मालिका सोडली.
4 / 7
सुकीर्ती ३७ वर्षांची असून अविवाहित आहे. जोडीदाराविषयी ती एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'माझं अनेकदा कोस्टारसोबत नाव जोडलं गेलं.'प्यार की ये एक कहानी'मध्ये विवियनसोबतही माझी चर्चा झाली. पण आमच्यात तसं काही नव्हतं.'
5 / 7
'पण मी कधीच कोणा कलाकारासोबत सेटल होऊ शकत नाही. माझे दोन सीरियस रिलेशनशिप राहिले आहेत. त्यांचा इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. मी कधीच इंडस्ट्रीतल्या लोकांना डेट करणार नाही.'
6 / 7
'कलाकारांचा घटस्फोट झाला ऐकलं खरंच खूप वाईट वाटतं. आता त्या दोन लोकांचं नातं नक्की कसं आहे हे ते दोघंच सांगू शकतात. माझ्यावर या गोष्टींचा परिणाम होतो.'
7 / 7
ट्रोलिंगवरही सुकिर्ती म्हणाली, 'मला ट्रोलिंगमुळे फरक पडत नाही. लोक तर शाहरुख खानलाही ट्रोल करतात.' सुकिर्तीचे इन्स्टाग्रामवर 3 लाख फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकाररिलेशनशिपलग्न