Paridhi Sharma : 'जोधा अकबर'ची जोधा आता कशी दिसते ? बघा लेटेस्ट Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 08:21 IST
1 / 12जोधा अकबर मालिकेतून घराघरात पोहोचलेली परिधी शर्मा अचानक छोट्या पडद्यावरुन गायब झाली. जोधा अकबर नंतर तिला परत फारसं बघितले गेले नाही.2 / 12जोधा अकबर सिरिअलमुळे परिधीला कमालीची लोकप्रियता मिळाली होती. यातील परिधीचा अभिनय आणि तिची अकबरसोबतची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली.3 / 12परिधीने तिच्या साध्या दिसण्याने चाहत्यांचे मन जिंकले. तिच्या वागण्यात, दिसण्यात कुठलाच बडेजाव नव्हता. चाहत्यांना तिचा हाच स्वभाव भलताच आवडला.4 / 12परिधीने तिच्या करिअरची सुरुवात 'तेरे मेरे सपने' या मालिकेतून केली. मात्र यातून तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही.5 / 12यानंतर तिला 'रुक जाना नही' ही मालिका मिळाली. मात्र ही मालिका देखील काही काळातच बंद पडली. यातही परिधीला यश मिळाले नाही.6 / 12२०१५ मध्ये परिधीला जोधा अकबर ही मालिका ऑफर झाली आणि ती रातोरात स्टार झाली. तिला मुख्य जोधा ची भूमिका मिळाल्याने तिचे नशीबच उजळले.7 / 12परुधीनेही या संधीचं सोनं केलं. तिचा मालिकेतील अभिनय खूपच पसंतीस पडला. तिला यासाठी बेस्ट टीव्ही अॅक्ट्रेसचा अवॉर्डही मिळाला.8 / 12मात्र जोधा अकबर मालिका संपल्यानंतर जणू परिधी गायबच झाली. तर परिधी सध्या कुठे आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला.9 / 12जोधा अकबर नंतर काही वर्षातच परिधीने लग्न केले. २०१६ मध्ये तिने एका मुलालाही जन्म दिला.10 / 12मुलाच्या जन्मानंतर परिधीने 'ये कहा आ गये हम' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले. मात्र फीट नसल्याने तिने हा शो अर्ध्यातच सोडून दिला.यानंतर २ वर्षांनंतर परिधीने २०१८ मध्ये 'पटियाला बेब्स' या मालिकेतून कमबॅक केले.11 / 12या शो ला अनेकांनी पसंत केले मात्र शोची क्रेझ हळूहळू संपली.यानंतर तिने 'जग जननी मॉं वैष्णोदेवी' आणि 'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेतही काम केले.12 / 12सध्या ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे डान्सचे फोटो व्हिडिओ ती चाहत्यांसाठी शेअर करत असते