Join us  

PHOTOS : श्वेता तिवारीच्या ऑनस्क्रीन लेकीचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, fat to fit फोटो पाहून सगळेच थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 2:49 PM

1 / 11
‘परवरिश’ या टीव्ही मालिकेतील श्वेता तिवारीची मुलगी तुम्हाला आठवत असेलच? होय, अभिनेत्री आशिका भाटिया हिने या मालिकेत श्वेता तिवारीच्या मुलीची भूमिका साकारली होती.
2 / 11
सध्या ही आशिका भाटिया चर्चेत आहे ती तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे. होय, अभिनेत्रीने आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच थक्क केलं आहे.
3 / 11
आधी आशिका चांगलीच गोलमटोल होती. तिचं वजन चांगलंच वाढलं होतं. पण आत्ता तुम्ही तिला पाहाल तर विश्वास बसणार नाही. तिचं फॅट टू फिट अवतार पाहून सगळेच हैराण आहेत.
4 / 11
एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे आशिकाला खूप काही ऐकावं लागलं. मोटी, भैंस असं काय काय लोक तिला म्हणतं. पण आता तिने बॉडी शेमिंग करणाºया प्रत्येकाचं तोंड बंद केलं आहे.
5 / 11
एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे आशिकाला खूप काही ऐकावं लागलं. मोटी, भैंस असं काय काय लोक तिला म्हणतं. पण आता तिने बॉडी शेमिंग करणाऱ्या प्रत्येकाचं तोंड बंद केलं आहे.
6 / 11
आशिका भाटिया सध्या टीव्हीवर फारसी अ‍ॅक्टिव्ह नाही. कारण आता ती मीडिया इन्फ्लुएंसर बनली आहे. आशिका भाटिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
7 / 11
आशिकाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. परवरिश, मीरा, कुछ रंग प्यार के ऐसे भी अशा मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
8 / 11
‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात आशिका दिसली होती. मात्र या चित्रपटानंतर आशिकाचा मोठा अपघात झाला होता.
9 / 11
या अपघातात तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली होती.तिच्यावर गुडघ्याची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनतर अभिनेत्री बरेच महिने बेडरेस्टवर होती.
10 / 11
अशात तिचं वजन प्रचंड वाढलं होतं. मात्र तरीसुद्धा ती न लाजता सोशल मीडियावर आपले विविध व्हिडीओ शेअर करत असे. यावेळी अनेकांनी तिला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केलं.
11 / 11
मात्र आशिकाने जिद्द न सोडता स्वत: मध्ये इतका बदल केला. आशिकाच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजनश्वेता तिवारीटिव्ही कलाकार