Join us

"मला ५० मुलांनी तरी प्रपोज केलं पण...", साखरपुड्यानंतर तेजस्विनी लोणारीचं जुनं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:33 IST

1 / 10
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा नुकताच साखरपुडा झाला. शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरसोबत ती लग्नगाठ बांधणार आहे.
2 / 10
तेजस्विनीच्या साखरपुड्याची बातमी अचानक आल्याने सर्वांना धक्काच बसला. ती राजकीय कुटुंबाची सून होणार असल्याने या बातमीने आणखी लक्ष वेधून घेतलं.
3 / 10
तेजस्विनीने काही महिन्यांपूर्वी मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने 'मला अनेक मुलांनी प्रपोज केलं पण लग्नासाठी कोणीच विचारलं नाही' असं ती म्हणाली होती. आता तिची मुलाखत पुन्हा व्हायरल होत आहे.
4 / 10
'राजमंच'ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी म्हणाली होती की, 'मी पुण्याची आहे. येवला माझं आजोळ आहे. वडील आर्मीत असल्याने लहानपणी खूप फिरणं झालं. पण नंतर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. दहावीनंतर मी पुण्यात होते. नंतर मुंबईत आले.'
5 / 10
'मला बऱ्याच मुलांनी प्रपोज केलं. ५० मुलांनी तरी केलं असेल. मला अनेक जण म्हणतात की तू किती सुंदर दिसतेस. तुझ्या मागे तर मुलांची रांगच लागली असेल.'
6 / 10
'पण मला कोणीच तसं येऊन अप्रोच केलं नाही. कदाचित त्यांना वाटतं की ही आधीच रिलेशनशिपमध्ये असेल. अनेक जण अगदी मागे लागलं पण लग्नासाठी कोणी विचारलंच नाही.'
7 / 10
'२००६ पासून मी इंडस्ट्रीत आहे. पण मला इंडस्ट्रीतलं कोणीच आवडलं नाही. आधी कॉलेजमध्येही सगळे ईरानी पोरं होती. मी करिअरवर लक्ष देणारी मुलगी होते त्यामुळे तिथेही मी कधी प्रेमात पडले नाही.'
8 / 10
तेजस्विनीला 'चित्तोड की रानी पद्मिनी' मालिकेतून ओळख मिळाली. नंतर ती काही सिनेमांमध्ये दिसली. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत तिचा सिनेमा गाजला.
9 / 10
तेजस्विनी 'बिग बॉस मराठी ४' मध्येही दिसली. नंतर 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत तिने प्रिया मराठेला रिप्लेस केलं होतं.
10 / 10
तेजस्विनीने काही महिन्यांपूर्वीच स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं. 'तेजक्राफ्ट'असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. तिचं स्वत:चं एक 'एनजीओ'ही आहे
टॅग्स :मराठी अभिनेतालग्नटिव्ही कलाकार