By देवेंद्र जाधव | Updated: April 20, 2026 09:54 IST
1 / 7काल 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले नुकतीच पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. तन्वीने 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तिच्या नावावर केली. तन्वी'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली आणि तिने इतिहास रचला. 2 / 7तन्वी कोलतेनिमित्त 'बिग बॉस मराठी ६' मध्ये ऐतिहासिक गोष्ट घडली. ती म्हणजे तब्बल ५ सीझननंतर 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक महिला स्पर्धक विजेती झाली आहे.3 / 7याआधी 'बिग बॉस मराठी ६'मध्ये पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती झाली होती. मेघानंतर थेट सहाव्या सीझनला 'बिग बॉस मराठी'ला एक महिला स्पर्धक विजेती म्हणून मिळाली आहे.4 / 7'बिग बॉस मराठी ६'च्या विजेत्यांकडे नजर टाकली तर पहिल्या पर्वात मेघा धाडे, दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरे, तिसऱ्या सीझनला विशाल निकम, चौथ्या सीझनला अक्षय केळकर, पाचव्या सीझनला सूरज चव्हाण हे लोक विजयी झाले आहेत. 5 / 7आता 'बिग बॉस मराठी ६'च्या सहाव्या सीझनमध्ये विजयी झालेल्या तन्वी कोलतेवर बक्षीसांची लयलूट झाली आहे. कलर्स मराठीकडून तन्वीला १५ लाख रुपये मिळाले आहेत. तर स्पॉन्सर्सकडून तन्वीला e स्कूटी भेट म्हणून मिळाली. 6 / 7दुसरीकडे दागिन्यांची खरेदी करण्यासाठी तन्वीला १० लाखांचं गिफ्ट वाउचरही मिळालं आहे. अशाप्रकारे 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाल्यावर तन्वी मालामाल झाली आहे.7 / 7तन्वीने आसपास एकापेक्षा एक धुरंधर स्पर्धक असताना तिच्या उत्कृष्ट खेळाने आणि रोखठोक स्वभावामुळे 'बिग बॉस मराठी ६'चं विजेतेपद पटकावलं. तन्वी जिंकल्यानिमित्त अनेकांनी तिचं अभिनंदन केलं.