Join us  

हॉलिवूडची हिरोईन! अक्षयाचं बोल्ड फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल "सुंदरा मनामध्ये भरली"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 6:19 PM

1 / 9
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
2 / 9
नुकतंच तिने हॉट फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन अक्षयाने याचे फोटोही शेअर केले आहेत.
3 / 9
या फोटोंमध्ये अक्षयाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. गळ्यात मोत्याची माळ घालत अक्षयाने रेट्रो लूक केला आहे.
4 / 9
हे फोटो शेअर करत अक्षयाने नववर्षाच्या शुभेच्छा तिच्या चाहत्यांना दिल्या आहेत. अक्षयाचं हे नववर्षाचं बोल्ड फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे.
5 / 9
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6 / 9
'तू छान आहेस', अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने 'हॉलिवूडची हिरोईन' असं म्हटलं आहे.
7 / 9
अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी कलाविश्वातही अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे.
8 / 9
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षया झळकली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.
9 / 9
तिने 'चूक भूल द्यावी घ्यावी' या झी वाहिनीवरील मालिकेतही काम केलं आहे. त्याचबरोबर 'सावधान इंडिया'मध्येही अक्षया झळकली होती.
टॅग्स :अक्षया नाईकटिव्ही कलाकारसेलिब्रिटी