तरूणींनाही लाजवेल इतकी ग्लॅमरस दिसते श्वेता तिवारी, बघून कुणीही हेच म्हणेल - श्वेता जाम भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 15:15 IST
1 / 5अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या 'खतरों के खिलाडी' शोमध्ये दमदार परफॉर्मन्स देताना दिसत आहे. सोबतच सोशल मीडियावर आपल्या अदांनी फॅन्सना घायाळ करत आहे. गेल्याच आठवड्यात तिने रेड ड्रेसमधील फोटोशूट केलं होतं. आता पुन्हा एका नव्या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे. ४० वयातही श्वेता आजच्या तरूणींना लावजेल अशा ग्लॅमरस लूकमध्ये दिसते आहे. 2 / 5श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे ती सोशल मीडिया आणि टीव्ही दोन्हीकडे धुमाकूळ घालत असते. पर्सनल लाइफमध्ये सतत वाद सुरू असतानाही तिची लोकप्रियता मात्र जराही कमी झाली नाही. उलट तिची लोकप्रियता तिच्या वाढत्या वयासोबत वाढताना दिसते.3 / 5श्वेता तिवारीने अलिकडेच आपलं वजन कमी केलं. तसेच ती फिटनेसकडेही फारच गंभीरतेने बघते आहे. हे तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंवरून बघायला मिळतं. ती तिच्या ग्लॅमरस लूक आणि अदांनी फॅन्सना भुरळ घालते आहे. श्वेताने तिच्या नव्या फोटोशूटचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती एखाद्या हॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसत आहे. बोल्ड ड्रेसमुळे तिचा फिगरची खुलून आला आहे.4 / 5या फोटोंमद्ये श्वेताने सिल्व्हर शिमरी सीक्विन असलेला बॉडी हगिंग ड्रेस घातला आहे. या ड्रेसचा साइड स्लिटमुळे श्वेताचा लूक आणखी जास्त ग्लॅमरस वाटतो आहे. लुक कम्प्लिट करण्यासाठी तिने बोल्ड मेकअपही केलं आहे. तर केस मोकळे सोडले आहेत.5 / 5४० वर्षीय श्वेता २ मुलांची आई आहे आणि तरीही लहान वयाच्या तरूणींना लाजवेल असं तिचं सौंदर्य खुलत आहे. ती आजही फार बोल्ड आणि ब्युटीफूल दिसते. श्वेताला पर्सनल लाइफमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. सध्या ती सिंगल आहे. पण तरीही ती या समस्यांना मागे टाकत आपल्या कामावर फोकस करत आहे.