Join us
Daily Top 2Weekly Top 5

तू तेव्हा तशी...! अभिनेत्री शिल्पा तुळसकरच्या या फोटोंवर व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 17:46 IST

1 / 8
कधी देवकी तर कधी राजनंदिनी होऊन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. नुकतीच शिल्पाची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
2 / 8
2018 मध्ये झी मराठीवर आलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेत शिल्पा प्रमुख भूमिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली राजनंदिनी सरंजामेची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने झी मराठीवर पुनरागमन केलं आहे.
3 / 8
झी मराठीवरच्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.
4 / 8
चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सौरभची भूमिका स्वप्नीलने साकारली असून अनामिकाच्या भूमिकेत शिल्पा दिसणार आहे.
5 / 8
अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा जन्म 10 मार्च 1977 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. ती भावंडांमध्ये सर्वात मोठी असून तिला दोन लहान भाऊ आहेत. शिल्पाच्या पतीचं नाव विशाल शेट्टी असं आहे. या दांम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
6 / 8
रूईया महाविद्यालात असताना शिल्पाने नाटकात काम करायला सुरूवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी पहिलं नाटक करणा-या शिल्पाला यानंतर अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. काही जाहिरातींमध्ये ही तिने काम केले.
7 / 8
शिल्पाने 1993 मध्ये ‘ब्योमकेश बक्षी’ या हिंदी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. दूरदर्शनवरच्या या गाजलेल्या मालिकेतील एका एपिसोडमध्ये तिने एक पाहुण्या कलाकाराची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
8 / 8
2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘देवकी’ या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. हा चित्रपट अतिशय गाजला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केलं होतं. मराठीसोबतच त्यांनी मल्याळम, गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये ही काम केलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार