"हो! मी रिलेशनशिपमध्ये आहे अन्..."; रुपाली भोसलेचा मोठा खुलासा, लग्नाबद्दल काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:15 IST
1 / 7रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रुपालीला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. 2 / 7आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेतून रुपालीला खूप प्रसिद्धी मिळाली. रुपालीने नुकत्याच एका मुलाखतीत ती रिलेशनशीपमध्ये आहे, असा खुलासा केलाय.3 / 7राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रुपालीने हा खुलासा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. रुपाली म्हणाली, हो मी रिलेशनशीपमध्ये आहे. मी डेट करतेय4 / 7पुढे रुपाली म्हणाली, 'माझं आधीच लग्न झालंय. माझं स्वतःसोबत लग्न झालंय', असा गंमतीशीर खुलासा रुपालीने केलाय. पुढे रुपालीने लग्नासंबंधी विचार मांडले.5 / 7रुपाली लग्नासंबंधी विचार सांगताना म्हणाली की, तिलाही आयुष्यात पुढे पाऊल टाकायचंय. लग्नही करायचंय. पण जोवर तिचा भाऊ संकेत मार्गी लागत नाही तोवर ती तिच्या लग्नाचा विचार करु शकत नाही.6 / 7संकेतचे दोनाचे चार हात झाले. त्याला आणि माझ्या आई-बाबांना सांभाळणारी गोड गोंडस मुलगी आली की, मग मी लग्नाच्या दिशेने विचार करेन, असं रुपाली म्हणाली.7 / 7अशाप्रकारे भावाचं लग्न झाल्याशिवाय रुपाली स्वतःच्या लग्नाचा विचार करणार नाही, हे तिने स्पष्ट केलंय. रुपाली लवकरच लपंडाव या मालिकेत दिसणार आहे