हलव्याचे दागिने, सुगडाची पूजा अन् पतंग! पारंपरिक थाटात रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली मकरसंक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:35 IST
1 / 7रेश्मा शिंदेने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली आहे. रेश्माने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.2 / 7हलव्यांचे दागिने परिधान करुन रेश्मा शिंदेने सुगडाची पूजा केली आहे. रेश्माने आनंदात मकरसंक्रांत साजरी करुन फोटोसाठी पोज दिली आहे3 / 7रेश्मा शिंदेने यावेळी हातात पतंग धरुन खास फोटो काढले. रेश्माला पतंग उडवण्याची आवड आहे हेच यावरुन दिसतंय4 / 7रेश्मा शिंदेची ही लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत आहे. रेश्माने हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.5 / 7रेश्मा शिंदे सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अभिनय करतेय. या मालिकेत रेश्मा आणि अभिनेता सुमित पुसावळेची जोडी चांगलीच आवडत आहे6 / 7रेश्मा शिंदेने याआधी रंग माझा वेगळा मालिकेत अभिनय केला होता. या मालिकेत रेश्माने साकारलेली दीपाची भूमिका चांगलीच गाजली7 / 7अशाप्रकारे रेश्मा शिंदेने लग्नानंतर उत्साहात पहिली मकरसंक्रांत साजरी केली आहे. रेश्मा मालिकेत साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय