'गोट्या' मालिकेतील बालकलाकार आठवतोय का? विदेशात स्थायिक होत करतोय 'या' क्षेत्रात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 07:00 IST
1 / 990 च्या काळात प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे गोट्या. ही मालिका त्याकाळ प्रचंड गाजली होती.2 / 9उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.3 / 9या मालिकेतील सर्वात जास्त गाजलेली भूमिका म्हणजे गोट्या. बालकलाकार जॉय घाणेकर याने ही भूमिका साकारली होती.4 / 9गोट्या या भूमिकेमुळे जॉयला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलं.5 / 9 जॉय घाणेकर हा सिनेदिग्दर्शक आणि निर्माते गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. त्यांना जॉय आणि ध्रुव ही दोन मुलं आहेत. 6 / 9जॉय घाणेकर यांनी शिक्षणासाठी कलाविश्वातून ब्रेक घेतला. पण तो कायमचाच. त्यामुळे हा चिमुकला गोट्या आता कसा दिसतो हा प्रश्न अनेकांना पडतो.7 / 9सूत्रांच्या माहितीनुसार, गोट्या म्हणजेच जॉय अमेरिकेत एका कंपनीत प्रॉडक्ट हेड म्हणून काम करतो. 8 / 9जॉयचं लग्नही झाले असून त्याला एक मुलगाही आहे. अभिनयापासून तो आता दूर असला तरी त्याने साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करुन आहेत. सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो असून त्यात त्याला ओळखणं कठीण आहे.9 / 9जॉयचा भाऊ ध्रुव घाणेकरनेही अभिनेत्री इशिता अरुणसोबत लग्न केले आहे. इशिता ही 'ऐका दाजिबा' गाण्यामुळे प्रकाशझोतात आली होती. इशिता ही गायिका ईला अरुण यांची मुलगी आहे.