Join us

"मला खरं प्रेम हवंय, पुढच्या ५ वर्षात लग्न करून..."; २२ वर्षीय लोकप्रिय अभिनेत्रीने केलंय प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:47 IST

1 / 10
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रीम शेखला पुढच्या ५ वर्षात लग्न करायचं आहे. पण जर असं नाही झालं तर तिने एक मुलगी दत्तक घेण्याचं ठरवलं आहे. भारती सिंहच्या चॅट शोमध्ये तिने असं म्हटलं आहे.
2 / 10
'मी 'ओल्ड स्कूल' आहे, विशेषतः प्रेमाच्या बाबतीत. मला वाटत नाही की २२ व्या वर्षी कोणी म्हणत असेल की, जर चांगला मुलगा असेल तर मला सांगा. पण मी तसंच म्हणते'
3 / 10
'जर कोणी मला विचारलं की, पुढच्या ५ वर्षात तुला काय करायचं आहे? तर मी म्हणेन की लग्न करून मला सेटल व्हायचं आहे.'
4 / 10
'मी डेटिंगच्या नादात पडत नाही कारण मला माहित आहे की ते किती वेदनादायक असू शकतं. मला खरं प्रेम हवं आहे' असं रीमने सांगितलं.
5 / 10
'मी ज्याला डेट करेन त्याच्याशी मी लग्न करेन असं नाही. पण तो असा व्यक्ती असेल ज्याचं माईंडसेट माझ्यासारखच असेल. त्यालाही सेटल व्हायचं असेल आणि टाईमपास करायचा नसेल.'
6 / 10
'मी अरेंज्ड मॅरेजसाठीही तयार आहे. माझ्या आयुष्यात एक अशी फेज होती जेव्हा मी कोणाशी तरी खूप अ‍ॅटेच्ड होते, हे जवळपास ४ वर्षांआधीच आहे.'
7 / 10
'फक्त ६ महिने बोलल्यानंतर आम्हाला समजलं की याचं काहीच होणार नाही. म्हणूनच आम्ही वेगळे झालो. पण प्रेम यशस्वी न झाल्याने ते कायम मनात राहिलं आहे.'
8 / 10
'माझ्या आईला सर्व काही माहित आहे. जरी मी कोणाला भेटायला गेलो तरी मी तिला जाण्यापूर्वी सांगते. मी डेटिंग करणारी व्यक्ती नाही आणि मला घाईही नाही.'
9 / 10
'५ वर्षांत लग्न कराण्यासाठी मी तयार आहे. जर तसं झालं नाही तर मी एक लहान मुलगी दत्तक घेईन आणि माझं आयुष्य जगेन.'
10 / 10
'मी माझ्या आईसोबत राहते. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. मला लवकरच लग्न करायचं आहे जेणेकरून माझं मूल माझ्या आईसोबत राहू शकेल' असं देखील रीम शेखने म्हटलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारलग्न