आधी गणपती अन् आता वाढदिवसालाही राकेश बापटसोबत दिसली EX WIFE, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:37 IST
1 / 10मराठी अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून मराठी प्रेक्षकांचा लाडका झाला. अनेक वर्ष हिंदीत काम केल्यानंतर त्याने पहिल्याच मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं.2 / 10दरवर्षी गणेशोत्सवात राकेश बापट चर्चेत असतो. तो स्वत:च्या हातांनी उत्तमरित्या बाप्पाची मूर्ती घडवतो. त्याने त्याच्या काही सहकलाकारांनाही मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे.3 / 10यंदाही राकेशने बाप्पाची सुंदर मूर्ती घडवली. त्याच्या घरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा राकेशची पूर्व पत्नी रिद्धी डोगराकडे वळल्या. 4 / 10रिद्धी डोगरा यंदा राकेशच्या कुटुंबासोबतच होती. विसर्जनाच्या दिवशीही ती दिसली. ६ वर्षांपूर्वीच दोघं विभक्त झाले होते. मग रिद्धी पुन्हा राकेश आणि त्याच्या कुटुंबासोबत कशी असाच प्रश्न अनेकांना पडला.5 / 10इतकंच नाही तर रिद्धी राकेशच्या अनेक पोस्टवर कमेंटही करत आहे. राकेशने एका संस्थेमध्ये जाऊन शाळकरी, तरुण मुलांना बाप्पाची मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण दिलं. यावरही रिद्धीने कमेंट करत त्याचं भरभरुन कौतुक केलं.6 / 10शिवाय नुकताच राकेशने जवळच्या मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा केला. त्याने केक कट करतानाचे फोटो शेअर केले. त्यातही रिद्धी दिसत आहे. 7 / 10रिद्धीला राकेशसोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच काहींनी कमेंट्समध्ये रिद्धीला ट्रोलही केलं आहे. 'कधीही पाहा आजकाल राकेशच्या मागे असते','काही लोक कधीच पिच्छा सोडत नाहीत' अशा कमेंट्स आल्या आहेत.8 / 10राकेश आणि रिद्धीची ओळख 'मर्यादा' मालिकेच्या सेटवर झाली होती. नंतर ते प्रेमात पडले. २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांच्यात खटके उडायला लागले आणि ८ वर्षांनंतर २०१९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. 9 / 10राकेश बापटचे फिल्मी करिअर पाहिजे तसे यशस्वी ठरले नाही. ‘तुम बिन’,’दिल विल प्यार व्यार’, ‘नाम गुम जाएगा’, ‘गिप्पी’ या हिंदी सिनेमांसोबतच ‘वृंदावन’, ‘सविता दामोदर परांजपे’ मराठी सिनेमातही तो झळकला आहे.10 / 10२०२१ मध्ये राकेश बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाला. इथे त्याचं शमिता शेट्टीसोबत अफेअर गाजलं. बाहेर आल्यावरही त्यांचं रिलेशनशिप सुरु होतं. मात्र काही काळानंतर दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.