सूरजभैय्याची नवी प्रेमकहाणी; जाणून घ्या, कोण आहे राजसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:16 IST
1 / 11सध्या सोशल मीडियावर अभिनेता राज हंचनाळे याच्या नव्या मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे.2 / 11तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर राज एका नव्या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.3 / 11नुकत्याच या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आणि सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांची चर्चा रंगली. यामध्येच राजसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय.4 / 11प्रोमोमध्ये दिसत असलेल्या अभिनेत्रीचं नाव प्रतीक्षा शिवणकर आहे. प्रतीक्षाने या मालिकेपूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.5 / 11प्रतीक्षा मूळची गडचिरोली येथील असून ती मुंबईत स्थायिक आहे. प्रतीक्षाचं लग्न झालं आहे. तिने २०१९ मध्ये डॉ. अभिषेक साळुंकेसोबत लग्नगाठ बांधली.6 / 11प्रतीक्षाने प्रशांत दामले यांच्या टी स्कुलमधून परफॉर्मन्स डेव्हलपमेंट कोर्स इन थिएटर आर्टस् चे प्रशिक्षण घेतलं आहे. इथेच प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातून तिला अभिनयाची नामी संधी मिळाली.7 / 11कॉलेज डायरी या चित्रपटात प्रतीक्षा महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. तसंच स्टार प्रवाहवरील कॉमेडी बिमेडी या शोमध्ये तिने अनेक विनोदी स्कीट्स सादर केल्या आहेत.8 / 11प्रतीक्षा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.9 / 11प्रतीक्षा आणि तिच्या नवऱ्याने खास गोव्यात फोटोशूट केलं होतं.10 / 11साध्या लूकमध्येही प्रतीक्षा कमालीची सुंदर दिसते.11 / 11सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रतीक्षाने शेअर केलेला फोटो