1 / 7प्रियदर्शनी इंदलकर ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शनीला आपण हास्यजत्रेत विविध भूमिका साकारताना पाहिलंय2 / 7प्रियदर्शनी इंदलकरचं आज हास्यजत्रेच्या माध्यमातून जरी नाव असलं तरी सुरुवातीला तिने स्ट्रगलचा काळही बघितला आहे. इतकंच नव्हे इंजिनिअरींग करुन तिला चांगल्या पगाराची नोकरीही होती3 / 7मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनीने हा किस्सा सांगितला. प्रियदर्शनीने IT इंजिनिअरींग केलंय. चांगले मार्क्स मिळवून ती पास झाली. 4 / 7प्रियदर्शनी म्हणाली, इंजिनिअरींग केल्यावर पुण्याला बाणेरला कंपनी होती. तिथे अशीच मी मुलाखत द्यायला गेले आणि सिलेक्ट झाले. मला ४ लाखांचं पॅकेज मिळालं होतं.5 / 7प्रियदर्शनीने १५ दिवस नोकरी केली. त्यानंतर तिला NSD (नॅशनल स्कूल ऑफ ड्राम, दिल्ली) कडून मेल आला की, ती पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झालेय. त्यानंतर प्रियदर्शनीने नोकरी सोडायचा निर्णय घेतला.6 / 7अशाप्रकारे NSD मध्ये प्रवेश घेता यावा म्हणून प्रियदर्शनीने ४ लाखांच्या नोकरीवर पाणी सोडलं. पण पुढे ज्यासाठी तिने नोकरी सोडली त्या NSD मध्ये तिचा प्रवेश झाला नाही.7 / 7परंतु तरीही निराश न होता प्रियदर्शनी नाटकांमधून काम करत राहिली. आणि शेवटी महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये तिला अभिनयाची संधी मिळाली आणि तिने या संधीचं सोनं केलं