Join us

Marathi celebrities : 'हे' 6 मराठी कलाकार करतायेत हिंदी कलाविश्वावर राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 19:08 IST

1 / 7
गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे हिंदी-मराठीमधील अनेक कलाकार अन्य भाषांमध्ये काम करताना दिसत आहेत. यामध्येच हिंदी कलाविश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारे मराठी कलाकार कोणते ते पाहुयात.
2 / 7
पूर्वा गोखले - पूर्वा गोखले हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. पूर्वाने अनेक कौटुंबिक, ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठीप्रमाणेच ती हिंदी कलाविश्वातही कार्यरत आहे. सध्या पूर्वा तुझसे ही राबता या हिंदी मालिकेत काम करत आहे.
3 / 7
तुषार दळवी - मेरे साई या मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणारा तुषार दळवी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
4 / 7
अक्षय म्हात्रे - सध्या तरुणींच्या मनात अक्षय म्हात्रेची तुफान क्रेझ आहे. उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा मराठमोळा अभिनेता घर एक मंदिर, इंडियावाली माँ या हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे.
5 / 7
स्वरदा ठिगळे- स्वरदा सध्या छोट्या पडद्यावरील एका एतिहासिक मालिकेत झळक आहे. यापूर्वी ती एकता कपूरच्या नागिन ५ मध्ये झळकली होती.
6 / 7
मुग्धा चाफेकर - छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय ठरलेल्या कुमकुम भाग्य मालिकेत मुग्धा चाफेकर झळकली आहे.
7 / 7
सोनल वेंगुर्लेकर - आपल्या सौंदर्यामुळे अनेकांचं लक्ष वेधणारी सोनल ये हैं चाहतेमध्ये झळकली होती.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार