Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:34 IST

1 / 7
पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी थाटामाटात लग्न केलं. या लग्नाची खूप चर्चा झाली.
2 / 7
पूजा आणि सोहम यांच्या लग्नात मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
3 / 7
पूजा आणि सोहम दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.
4 / 7
अभिनेत्री पूर्वा गोखलेने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अभिनेता अभिजीत केळकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, शिल्पा नवलकर, ऋजुता देशमुख या कलाकारांनी हजेरी लावलेली दिसतेय
5 / 7
या सर्व कलाकारांनी सोहम आणि पूजासोबत सुंदर फोटोशूट केलं. याशिवाय सर्वांनी लग्न सुरु असतानाच चांगलीच धमाल केलेली दिसली.
6 / 7
सोहम आणि पूजा गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर काल २ डिसेंबरला दोघांनी एकमेकांशी लग्न केलं.
7 / 7
सोहम हा अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे. तर पूजा अभिनेत्री असून ती सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अभिनय करत आहे.
टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगआदेश बांदेकरलग्नटेलिव्हिजनटिव्ही कलाकार