Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पैसा असेल तर ४ लग्न करु दे", पतीच्या दुसऱ्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्रीचं आश्चर्यकारक विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:55 IST

1 / 7
'पैसा असेल तर ४ लग्न करु दे मला काहीच प्रॉब्लेम नाही' असं विधान नुकतंच एका अभिनेत्रीने केलं आहे. नवऱ्याला दुसरं लग्न करायचं असेल तर तिने ही अट ठेवली असल्याचं ती सांगते. कोण आहे ही अभिनेत्री? आणि ती नक्की काय म्हणाली वाचा
2 / 7
हे विचित्र विधान करणारी ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे हिरा सुमरु(Hira Soomro). पाकिस्तानी ड्रामा 'तेरे बिन' मुळे तिला लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने मरियम ही व्यक्तिरेखा साकारली. हा ड्रामा भारतातही खूप पाहिला गेला आहे.
3 / 7
सध्या हिरा सुमरु तिच्या आश्चर्यकारक विधानामुळे चर्चेत आहे. नवऱ्याने हमखास दुसरं लग्न करावं कारण इस्लाममध्ये तशी परवानगी आहे असं ती म्हणते.
4 / 7
FHM पॉडकास्टमध्ये हिरा सुमरु म्हणाली, 'जर एखादा पती आपल्या पत्नीच्या भावनिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करत असेल तर त्याच्या दुसऱ्या लग्नाशी पत्नीला काहीच प्रॉब्लेम नसला पाहिजे.'
5 / 7
ती पुढे म्हणाली, 'महिलांनी पतीवर निर्भर असून नये. जर माझा नवराही दुसरं लग्न करत असेल तर मला प्रॉब्लेम नाही. पण मग त्याने माझ्या आणि मुलांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे.'
6 / 7
'इस्लाम धर्मात पुरुषाला ४ लग्न करण्याची परवानगी आहे तर मग त्याला थांबवणारी ती कोण? पत्नीने यावर आक्षेप घेण्याची गरजच नाही.' असंही ती म्हणाली.
7 / 7
हीरा सुमरु 'तेरे मेरे सपने', 'तेरे आने से' या मालिकांमध्ये दिसली आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीपाकिस्तानटेलिव्हिजनटिव्ही कलाकार