Join us

लोकप्रिय ठरलेली बालकलाकार 'वीरा' आठवते का? आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:20 IST

1 / 9
२०१२ ते २०१५ या कालावधीत लोकप्रिय झालेली एक वीर की अरदास-वीरा ही मालिका साऱ्यांच्याच लक्षात असेल.
2 / 9
ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली होती.
3 / 9
या मालिकेत मराठीमोळी अभिनेत्री स्नेहा वाघ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.
4 / 9
विशेष म्हणजे या मालिकेतील बालकलाकार हर्षिता ओझाने अनेकांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. त्यामुळे लोकप्रिय बालकलाकार म्हणून ती विशेष ओळखली जात होती.
5 / 9
हर्षिताने या मालिकेत मस्तीखोर वीराची भूमिका साकारली होती.
6 / 9
मालिका संपल्यानंतर छोटी वीरा काय करते?कशी दिसते? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. परंतु, ही लहानशी वीरा आता चांगलीच मोठी झाली आहे.
7 / 9
हर्षिता सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
8 / 9
हर्षिताला अभिनयासोबतच गायनाचीही विशेष आवड आहे. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं.
9 / 9
वयाच्या ५ व्या वर्षापासून हर्षिता कलाविश्वात सक्रीय आहे. मात्र, तिला अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात करिअर करायचं नाही असंही तिने सांगितलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार