Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' बिग बॉस स्पर्धकाला डेट करत होती मुनमुन दत्ता, रागामुळे तुटलं होतं दोघांचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 13:57 IST

1 / 7
टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आली आहे. मुनमुन दत्ताला 'तारक मेहता का उलटा चश्मा' मधील बबीता अय्यर उर्फ बबीताजी या भूमिकेसाठी ओळखलं जातं. बबीताजी गोकुळधाम सोसायटीतील महत्वाची व्यक्ती आहे आणि जेठालालच्या मनावर राज्य करते.
2 / 7
ताज्या माहितीनुसार, मुनमुन दत्ता याच मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राज अंदकतला डेट करत आहे. दोघांमध्ये बऱ्याच महिन्यांपासून नातं सुरू आहे. ज्याबाबत मालिकेतील सर्वच लोकांना माहीत आहे. मात्र, मुनमुन दत्ता याआधीही तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. अशी चर्चा होती की, मुनमुन दत्ता बिग बॉस स्पर्धकालाही डेट करत होती.
3 / 7
मुनमुन दत्ता कधी काळी बिग बॉस स्पर्धक अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ही गोष्ट २००८ सालातील आहे तेव्हा ते दोघे सोबत होते. पण अरमान कोहलीचा राग मुनमुन दत्तासोबतच्या नात्याच अडचण ठरला.
4 / 7
त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, अरमान आणि मुनमुन यांच्यात व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी भांडण झालं. यावेळी अरमान कोहलीने मुनमुन दत्तावर हातही उचलला होता. मुनमुनने याबाबत अरमान विरोधात पोलिसात तक्रारही दिली होती.
5 / 7
असंही सांगितलं जातं की, अभिनेत्री डॉली ब्रिंद्रा, मुनमुन आणि अरमानच्या भांडणाची साक्षीदार होती. डॉलीनुसार, जेव्हा अरमान आणि मुनमुन मॉरिशसला फिरायला गेले होते, तेव्हा अरमान आणि मुनमुनमध्ये भांडण होत होती. डॉली बिंद्राने सांगितलं होतं की, तिन मुनमुनला रडताना घराबाहेर जाताना पाहिलं होतं.
6 / 7
मुनमुन आणि अरमानमधील वाद कोर्टात गेला होता. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ता राज अंदकत याला डेट करत आहे. मुनमुन राजपेक्षा ९ वर्षाने मोठी आहे. राजचं वय आता २४ वर्ष आहे. तो तारक मेहता....मध्ये जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारतो.
7 / 7
सूत्रांनुसार, राज आणि मुनमुनच्या नात्याबाबत मालिकेतील सर्व कलाकारांना माहिती आहे. मालिकेच्या सेटवर सगळेच लोक त्यांच्या नात्याचा सन्मान करतात. मुनमुन आणि राज एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतात. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही.
टॅग्स :मुनमुन दत्ताटेलिव्हिजनअरमान कोहलीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा