Join us  

आई कुठे काय करते: अनिरुद्धचा बदलणार लूक? मिलिंद गवळींचं नवं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 11:35 AM

1 / 7
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी.
2 / 7
या मालिकेत मिलिंद गवळी, अनिरुद्ध ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवण्यास यशस्वी ठरली आहे.
3 / 7
कलाविश्वाप्रमाणेच मिलिंद गवळी सोशल मीडियावरही सक्रीय असतात. त्यामुळे नेटकरी कायम त्यांच्या नव्या पोस्टची वाट पाहत असतात.
4 / 7
अलिकडेच मलिंद यांनी नवीन फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
5 / 7
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर मालिकेतील त्यांचा लूक चेंज होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
6 / 7
या फोटोमध्ये अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी फॉर्मल लूकमध्ये दिसून येत आहेत.
7 / 7
सध्या सर्वत्र मिलिंद गवळी यांच्या फोटोशूटची चर्चा होत आहे.
टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारटेलिव्हिजन